एक अनाहूत भिती
एक अनाहूत भिती
एक अनाहूत भिती
सदा माझ्या मनी असे
कुणी मारेल का शीळ?
कुणी काढेल का छेड़
एक अनाहूत भिती
सदा माझ्या मनी असे
झाले आज सुशिक्षित
झाले आज आरक्षित
कधी होणार रक्षित
प्रश्न माझ्या मनी असे..
जर का मी बिनधास्त
तर जीवनाचा माझ्या
होई निर्भयासमान
करुण भयाण अस्त
एक अनाहूत भिती
सदा माझ्या मनी असे
किती मी मला सावरु
भयाने या का बावरु?
प्रश्न माझ्या मनी असे
आयुष्य का सुखी नसे?
असेल जर मी आई
मान मला ईश्वराचा
असेल जर तरुणी
वाईट विचार मनी
प्रश्न माझ्या मनी असे
चित्र वेगळे का दिसे?
का समानतेचा वाव
कागदावरचं दिसे?
हे आयुष्य मात्र माझे
खडतर फार असे
असेल जर स्त्रीगर्भ
समाजास मी नकोशी
इतिहासात मात्र मी
कर्तुत्वान शुर झाशी
प्रश्न माझ्या मनी असे
ही अनोखी प्रथा कशी?
