STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Inspirational

3  

Ashok Shivram Veer

Inspirational

1 min
136

ए, 

तुला समजावू कसे,

की हा देश नाही लहान,

तो तर आहे जगात महान


ए, 

तुला तर माहीतच आहे ना,

नाव त्याचे असे हिंदुस्थान,

प्रत्येकाला याचाच अभिमान


ए, 

कशाला करावी चिंता येथे,

सैनिक आमचे सदैव तत्पर सीमेवर,

करती देश रक्षण झेलूनी वार छातीवर


ए, 

घे समजून कर्तव्य तुझेही,

घाल आवर स्वार्थी मनाला,

नको देवू थारा भ्रष्टाचाराला


ए,

कर विचार संपवण्या जातपात,

हिंदू मुस्लीम शीख इसाई,

हम सब हैं भाई भाई।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational