Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Urmi Hemashree Gharat

Classics Others

3  

Urmi Hemashree Gharat

Classics Others

ए आजी..

ए आजी..

1 min
13.2K


ए आजी आठवतयं का तुला?

तु लहानपणी वाड्यात माझ्यासाठी बांधलेला झुला

कोणी कितीही ओरडलं तरी

पाठीशी घालायचीस तु मला ||१||

ए आजी आठवतयं का तुला ?

तु करायचीस मला तुपाची भाकरी

कारण प्रत्येक दिर्घ सुट्टीत

असायचे मी आजोळी||२||

ए आजी आठवतयं का तुला?

तु शिवला होता माझ्यासाठी झबला

काहीही झालं तरी पुरवायचीस 

तु माझा प्रत्येक हट्ट लडीवाळा||३||

ए आजी आठवतयं का तुला ?

तु दिवाळीत बनवायचीस पानवल्या

तु केलेल्या खमंग शिऱ्यावर

आम्हा सर्वांचा मनमुराद हल्ला||४||

ए आजी आठवतयं का तुला ?

बघ मला सारं आठवतयं

कारण बालपण तुझ्यामुळेचं 

अविस्मरणीय झालयं हे जाणवतयं क्षणोक्षणी मला ||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics