द्वंद्व मनीचे..!
द्वंद्व मनीचे..!
कुठलाही सण, तुझ्याविना सुना
सखें आठवतों, सहवास जुना...!
जगी आनंदाचा, उत्सव चालतों
तो तो माझ्या मनी, विरह पेटतो...!
कसे काय सांगू, वेड्या या मनाला
अति त्रास देतो, हा सणासुदीला...!
कुठे आहे आता, अरे सोबतीला?
सुखाचा संसार, तिने सजविला...!
मग का करु मी, उगी आस खोटी
कशाला कुढतो, दिपावली मोठी....!
प्रतिप्रश्न करी, कसा खुश होतो
प्रेम केले ना तूं, विसर का होतो...?
घर केले तिने, तुझ्या या मनात
तुच साठविलें, स्वप्न ते उरात....!
तुच केले तेव्हा, मला रें स्वाधीन
आता कसा हट्ट, वेगळे पाहीन...!
तुझ्या नयनांनी, गोंजारलें तिला
माझा काय दोष, का बोलतो मला...?
अरे मी स्वच्छंदी, हळूवार वारा
तुच केले बंदी, तुझा दोष सारा...!
आता माझे नाही, काहीही हातात
आता मुक्ती नाही, सदा ती मनात...!
कुठे हीं रमव, तुझे तू शरीर
तिच्या भेटीला रें, आता मी अधीर...!
बघना एकदा, शुभेच्छा देऊन
मला खात्री आहे, ती घेईल फोन....!

