दवबिंदू
दवबिंदू


आभाळाचे मायेचे लेकरू,
पाना-फुलांवर येऊन बसले.
सूर्याच्या प्रकाशाला घाबरून,
दवबिंदू हे गुपचुप येऊन निजले.
हिरव्या पानांवर स्फटिकांची गर्दी,
सुंदर नक्षी निसर्गाने साकारलेली.
फुलांच्या माळेचे अलंकार घालून,
धरणी माय कशी छान नटलेली.
आकाशातून अवतरली धरती,
पांघरून धुक्याच्या शालूत तू.
पानांवर चमकला दवबिंदू होऊन,
शालूत झगमगीत बिलोरी आरसे तू.