दूध कोंडी...!!
दूध कोंडी...!!
दूध कोंडी...!!
कोंडी फुटली फुटली
जणू दुधाची हंडी फुटली
शपथ सुटली सुटली
पुन्हा कमळाची गट्टी जमली....!
देवेन्द्राला राजू राज आला
राजूलाही देवेंद्र राज झाला
जणू गोपाळ काला पार पडला
डोळ्यादेखत चमत्कार घडला..!!
इच्छा तशी फळ
हे पुन्हा सिद्ध झाले रे
चला गडयांनो मनी सदैव
चांगलीच इच्छा धरा रे...!!!
स्वप्न पाहावे महान
थेंबानेही भागते तहान
हा ईश्वर रे खरा महान
रंकास ही राजा करी ही त्याची शान...!!
पांडुरंग ..पांडुरंग..पांडुरंग...!
