दुष्काळातली तेरावी रास...
दुष्काळातली तेरावी रास...
बारा ही राशींच्या ग्रह नक्षत्रांच्या तुलनेत
कमी ग्रह - नक्षत्र असणारी, पण
बारा ही राशींना मात देणारी
त्यांच्या ही पेक्षा सरस आणि श्रेेष्ठ ठरणारी
अशी ती दुष्काळातली तेरावी रास
जी माझी असेल...
ही रास ग्रह - नक्षत्रांवर कमी, पण
विचारांवर जास्त अवलंबून असेल
विचार वाईट आणि नकारात्मक असतील
तर रास ही नकारात्मक आणि वाईट ठरेल,
पण तेच जर विचार चांगले
आणि सकारात्मक असतील
तर रास ही सकारात्मक आणि चांगलीच ठरेल...
दृृृष्टी आणि दृष्टिकोन यांंच महत्त्व पटवणारी
अशी ती दुुष्काळातली तेेेरावी रास
जी माझी असेल...
आयुष्यात दुःख असतं, पण
दुःखाबरोबर सुख ही असतचं
सुुख - दुःखातील आंबट - गोड चवीची
जाणीव करून देणारी,
आयुष्यात जगण्याचं महत्त्व
काय असतं...? हे सांगणारी,
प्रत्येक संकटावर मात करून
जगण्यास प्रवृत्त करणारी
अशी ती दुष्काळातली तेरावी रास
जी माझी असेल...
