STORYMIRROR

Savita Kale

Tragedy

4  

Savita Kale

Tragedy

दुष्काळ एक समस्या

दुष्काळ एक समस्या

1 min
317

दुष्काळाचा राक्षस थैमान असा घाली

निसर्गाचे रूप साजिरे, कलंक तया लावी

वाभाडे काढी तीक्ष्ण नखाने, धरणीमातेची

गेली भंगून, कुरूप काया झाली आता तिची


निसर्गाचा हिरवा शालू, जीर्ण झाला सारा

चिवचिवणा-या चिमण्यांना नाही उरला निवारा

तान्ह्या तान्ह्या पोरांच पोट जाई खपाटीला

पान्हा सुध्दा फुटेना आता उपाशी त्या आईला


वाघाने अर्धी शिकार करूनी

हरणा सोडिले तडफडण्या

तसेच जीव हे राही भटकुनी

उपाशी अन्न-पाण्याविना


किडया-मुंगीचे जीवन झाले

जगलो काय अन् मेलो काय

समुद्रही आटला आसवांचा

गोठ्यात मरून पडली गाय


कुठे कमी पडतो तो पहारा

कसा दुष्काळ करी बसेरा

कुणा करावी आता विनवणी

धावा करण्या त्राण न उरला



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy