STORYMIRROR

Kishor Zote

Tragedy

4  

Kishor Zote

Tragedy

दुष्काळ ( अष्टाक्षरी )

दुष्काळ ( अष्टाक्षरी )

1 min
367

दुष्काळ 


आला दारात दुष्काळ

पाणी नाहीच घरात

लग्न जुळते तरीही

कुठे निघेना वरात


सारे दुरावले नाते

कोणी बोलवेना घरी

गाव आणि ते शहर

नाही राहीलीच दुरी


गावी येतोय टँकर

पाण्यासाठी मारामारी

पाणी नाही शहरात

झाले सारे जार करी


पारा चढतो उन्हात

लाही लाही या अंगाची

रुग्ण वाढे दवाखाना

कात्री लागते खर्चाची


गाव पडती ओसाड

येती लोंढे शहरात

चोरी खून दरोडयाची

वाढ होतेय गुन्हयात


वाद लोकप्रतिनिधी

प्रशासनी घडतात

पहा कसे पाण्यासाठी

राज्यभर लढतात


नदया जोड तो प्रकल्प

लवकर पूर्ण व्हावा

साथ वृक्षसंवर्धन 

असा दुष्काळ संपावा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy