दुर्दशा
दुर्दशा
दुर्दशा
आई रागवत होती, बायको विनवत होती।
" नका करू जीवनाची अशी अधोगती "॥
कधी करवादलास आईवर, कधी बायकोवर टाकलास हात।
कधी बाळाच्या दूधाचा पैसा संपवून ओतलीस दारू घशात॥
मित्रांच्या नादाने वाहवलास इतका।
व्यसनापायी घालवलास हातातला पैका॥
रोग जडले नाना, व्याधी पाठ सोडेना।
तरीही दारूच्या बाटलीची हौस काही भागेना॥
का रे करून घेतोस असे जीवाचे मातेरे?।
स्वतःच ओढवून घेतोस असे दुर्दशेचे फेरे?॥
देवाने दिलंय तुला हे तरुण, सुंदर जीवन।
तुझ्याच हाती आहे तुझे फुलवणे नंदनवन ॥
मित्र पांगतील एक दिवस, जेव्हा संपेल तुझा बहर।
ही दारूची बाटली तेव्हा, ओतेल घशात जहर॥
करू नको आयुष्याचा असा भीषण अंत।
सोड नाद बाटलीचा त्या, जी मृत्यूचे रूप नाशिवंत॥
