दुभंग
दुभंग
यंत्रयुगातील माणूस मी ,
आव्हान पेलण्यासाठी सज्ज झालो मी....
चाकावर आयुष्य माझे
आयुष्याभोवती फिरत रहातो मी
विचारांच्या गर्तेत पुढेपुढे जात रहातो
अन मी यंत्रवत होत जातो .....
शरीर विसरत जातो मी
कधीतरी जाणवते कुरकुर तेव्हा कळतं
निसटत गेलं बरच काही
बौद्धिकता जपता जपता
पावलं टाकत चालणं विसरलो कधीच मी
त्या पावलांकडे पुनः वळण्यासाठी बालपणीचे खेळ जपत गतिमान होतो मी .....
मैदान की ऑफीस
ऑफीस की मैदान या दुभंगात सदैव मी. ....
