STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

दसरा सण मोठा

दसरा सण मोठा

1 min
203

विजयादशमी शुभमुहूर्त

साडेतीन मुहूर्तातला

शुभ कार्याची सुरुवात

करीतसे विजयादशमीला  (1)


नवरात्री नऊ दिनी केले

देवीने युद्ध घनघोर रणी

दानवांना पराभूत केले

मातेने शक्तीनिशी झणी   (2)


दारुण शस्त्रे घेऊनी सवे

सिंहारुढ दुर्गामातेने

वध करुनी दानवांचा

रण जिंकले शक्तीदेवतेने   (3)


विजय मिळवला म्हणूनी

साजरी विजयादशमी

झेंडूफुलांच्या माळा रंगीत

शोभती घरोघरी , वाहनी   (4)


सीमोल्लंघनी जाती पुरुष

नारी प्रेमभरे ओवाळती

आनंदाने दसरा साजरा

जन सोने लुटूनी करती   (5)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract