दोस्ती
दोस्ती


एक नातं असं आपलंसं कसं
नाही कुठल्या बंधनात अडकलेलं
नाही जातपात वयाच्या धर्माच्या स्वाधीन झालेलं
प्रेम माया आणि आपुलकीने घट्ट पकडलेलं
आठवण आली की मिस यू यार म्हणणारं
अडचणीत आय एम अल्वेज देअर फॉर युचा हात देणारं
हसत खेळत मौजमस्तीत रमणारं
ये दोस्ती हम नहीं छोडेंगे हे गाणं गुणगुणारं
एक नातं रक्ताच्या नात्यापेक्षा खूप काही सांगणारं...