दोरी
दोरी
एकत्र राहिलेलं कसं विसरलं
रोपट्याला पाणी द्यायचं राहिलं
एकमेकांचा कडूपणा आला नजरेत
एकमेकांपासून सारे बघा लांबलेत
दोरी कधी कशी तुटली
परत बांधताना अपुरी पडली
धरून ओढताना पडायची भीती
जुळवणारी तीच एकमेव होती
चुकीचा समज मनात धरून
परत कशाला फिरायचे माघारून
