दिव्यप्रकाश
दिव्यप्रकाश
दिव्यप्रकाशाची एक पणती व्यसन मुक्तीची,
पेटवूया देशाच्या हमखास प्रगतीची.
जनजागृती करत, फलवूया सुखी संसार.
जीवनात नवचैतन्याची येईल हो बहार.
आडमार्गा नकळत वळलेत काही पाऊल.
जीवन सुधारण्यास करुन चाहूल.
दिव्यप्रकाशाची सुरूवात चला करून.
दहन करू व्यसनमुक्ती ती मिळून.
गणेश उत्सव, दुर्गापूजा थाटात सण करतोय.
दारू पिऊन नको तितका झिंगतोय.
स्वतःच्या पायावर मारुन कुराड मिरवतोय.
आयुष्याची माती करून जगतोय.
जुगार, मद्दपान, तंबाखू सिगारेटचा धूर.
जीवन आरोग्याचे करतोय चकणाचूर.
व्यसनापाई करे आयुष्याची नासधूस.
दिव्यप्रकाशाची पणती देऊन त्यास.
माणूसकीचा हात पुढे तो करून.
समाज कल्याणासाठी राहू एकत्र येऊन.
करूया व्यसनमुक्तीची चळवळ.
खरा होइल साजरा आनंदाचा सण.
