STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

दिवस - रात्र

दिवस - रात्र

1 min
342

सहा महिने दिवस

सहा महिने यामिनी

कसे असेल लोकांचे

दिनचक्र दैनंदिनी


 असे अखंड तेजस्वी

सहा महिने भास्कर 

रवी नच मावळता

निद्रा जाई दूरवर


रात्र सहा महिन्यांची

अवघड सहायची

दिनचक्र कामे सुरु

यत्ने पूर्ण करायची


तडजोड करी मनू

 निसर्गाशी नेहमीच

मार्ग नित्य निघतसे

कष्ट प्रयत्नांतूनच


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract