दिवस होता एक...
दिवस होता एक...
दिवस होता एक तो वादळाचा,
तुफान वारा हा असा सोसाट्याचा.
झाली गर्दी काळ्या काळ्या मेघांची,
आली घटिका जवळ ती वर्षावाची.
बरसू लागल्या पर्जन्य धारा,
संगे घेऊनी अमाप गारा.
सडा पाहूनी गारांचा कशी ही वेडावली,
पदर पसरूनी अशी ती वेचू लागली.
ओलीचिंब झाली ही श्वेतराणी,
रुप तिचे दिसे हे अधिक खुलूनी.
ओल्या अंगी झोंबू लागला मंद वारा,
जणू तिच्याच प्रेमात पडला निसर्ग सारा.
क्षणात लाजली ही कोमल काया,
असा सामोरी पाहूनी साक्षात राया.
दिवस होता एक तो वादळाचा,
तुफान वारा अन पावसाचा.

