दिले घेतले शब्द होते
दिले घेतले शब्द होते
दिले घेतले शब्द होते
दिल्या घेतल्या भावना...
दिले घेतले वचन होते
दिल्या घेतल्या शपथा...
आयुष्य विरान तिजवीण
हरविल्या होत्या भावना...
धनीच्या ती आधीन होती
शापित झाल्या शपथा...
उध्वस्त सारे कसे झाले
वचनांचीच झाली मरणशय्या...
हताश माझे हाल केले
हिरावून नेल्या तिने भावना...
शब्द ओठी नाहीसे झाले
भयभीत उजाड भावना...
वचनें झाली गर्भगळीत
भस्मसात झाल्या शपथा...

