दीपावली
दीपावली
अंतरातला आनंद अनुभवण्याचे
दिवाळी असते निमित्त...
मनात काळोख असताना
अंधारून जाते चित्त...
कंदील, पणत्या, दिवे
सगळे असतात कृत्रिम...
आशेची किरणे असतात
आनंदाचे स्रोत अंतिम....
दिपावली आनंद आणते
रटाळ त्या वातवरणी..
प्रकाशाचे पर्व असते
तेजोमय अवघी धरणी..
नात्यांमधली कटुता काढून
मनेही करू या साफ..
दुखावलेल्या गोष्टींची अडगळ
देतसे प्रेमाला चाप..
आंतरबाह्य आनंद हाच
असतो खरी दिवाळी..
स्नेहाच्या रुचकर फरालाने
येते नात्यांना नव्हाळी..
