दीप दिवाळी
दीप दिवाळी
अराजकाच्या झाकोळातून
लक्ष दिव्यांच्या तेजरूपाने,
स्वच्छ निखरू दे सारा परिसर
अवकाळी धारा धरणीवर
नाश करीत शेते बहु वावर,
पालवित नव आशा त्यावर
दीप दिव्यांची सांत्वन-फुंकर
कुठे जन्मले कुणी संपले,
रांगोळीच्या शतरंगांनी
काळाच्या फे-यांतून क्षणभर
मर्त्यपणाचा पडू दे विस्मर
दुःख ल्यायल्या,त्रास प्यायल्या
तप्त मनांची तृप्त क्षुधा करी,
फराळ रूचकर
गतवर्षाच्या नवपर्वाचा,
उल्हासित मनमनांत होवो सत्वर जागर!
