दीड जीबी
दीड जीबी
नेट कंपन्यांचा ग्राहकांसाठी
निघतोय रोजच नवा फतवा
करमेना जराही आम्हांला
जणू नेटच झालंय मितवा।।१।।
वाटोळं कराया आयुष्याचं
मिळतंय आम्हा रोज दीड जीबी
विसरून सारे भान बघा
बावरतो नेटसाठी तरीबी।।२।।
दुनिया झाली मोबाईल वेडी
अभ्यासात लागेना गोडी
आँनलाईन त्या गेमसाठी
रात्रही पडाया लागली थोडी।।३।।
नाही नात्यात राहिली जाण
हरवली माणुसकीची खाण
जपतांना नात्यांची ती वीण
राहिले न कुणाचे कुणाला भान।।४।।
गेलो कराया आम्ही प्रगती
खुंटली मानवाची रे मती
यंत्राच्या वाढत्या वापरानं
झाली आमची हो अधोगती।।५।।
नेट वापरणं एकदम इझी
निरक्षर होतात गुरूजी
दीड जीबीच्या नादापायी
सारं गावंच झालंय बिझी।।६।।
नेट वाल्यांची वाढलीय गती
रोज दीड जीबी येतंय हाती
वाटत असलं गोड तरी
आयुष्याची ते करतंय माती।।७।।
