शौर्य
शौर्य
अर्जुन-सुभद्रेचा वीर असा पुत्र
जयाचे अजरामर असे चरित्र
अभिमन्यु असे हो नाव तयाचे
कृष्णमामा सारखे पराक्रमी गोत्र।।१।।
गरोदर माता रथात जात असतांना
कृष्ण देत होता अर्जुनास चक्रव्युह भेदण्याचे धडे
रथात झोपी जाण्याआधी मातेने ऐकले अर्धवट
जटील असे कोणासही न सुटणारे कोडे।।२।।
उदरातील बाळाने धडे अर्धवट ग्रहण केले
पराक्रमाने तयाच्या नतमस्तक भलेभले
पित्याच्या शब्दाने अंगी बळ संचारून
चक्रव्यूह भेदण्या सैन्यासह जोशाने निघाले।।३।।
चक्रव्युह भेदतांना भल्याभल्यांना घायाळ केले
अभिमन्यूपुढे महापराक्रमी राजांनी गुडघे टेकले
अर्धवट ज्ञानाने बाहेर पडण्याची जाण नसतांना
जयद्रथाने अभिमन्युस कपटाने मारीले।।४।।
चक्रव्युह भेदण्याचे ज्ञान इतिहासात
कृष्ण,अर्जुन, द्रोणाचार्य अन् अभिमन्युस आले
पराक्रमाच्या शुर गाथांनी लहानपणातच
अभिमन्यु नावाचे वादळ अजरामर राहिले।।५।।