राखीची गाठ
राखीची गाठ
1 min
87
रक्षण तुझे करण्या बांधली
मी स्वतःच्या मनाशीच खुणगाठ
होत नाही कल्याण जोवर
राखीची गाठ
रक्षण तुझे करण्या बांधली
मी स्वतःच्या मनाशीच खुणगाठ
होत नाही कल्याण जोवर ताई
तोवर नाही बांधणार राखीची गाठ
राखण्या तुझे हित धजावतील
माझे दोन्ही सदैव बाहू
कोण येतो आडवा अन् कसा
येतो मध्यस्थी तेच आता पाहू
अन्याय अत्याचार करणाऱ्यास
आता आसमानी हिसका दाऊ
असं ठणकावून वचन देतो
तुझा हा थोरला भाऊ
नाही बरबाद करू देणार जीवन तुझे
अन् नाही सोडणार मी तुझी पाठ
तू सुखी झाल्याशिवाय
नाही बांधणार हाताला राखीची गाठ