STORYMIRROR

आनंद घायवट

Others

3  

आनंद घायवट

Others

माझे बालपण

माझे बालपण

1 min
270

आयुष्याची घडणावळ माझी

आठवते मजला आजपण

सुखाच्या मखमलीवरती

अवलंबून होते माझे बालपण


दिवस होते किती छान 

आठवा हो ते बालपणाचे

इतके करायचे लाड

 दुसरे नव्हते घरात कुणाचे


बालपण सरले,लाडही सरले

आले दिवस तरुण पणाचे

शिकून सवरून मोठा झालो

 लागे मनी ध्यास पैसा कमवण्याचे


किती रम्य अन् किती सुंदर

होते हरवलेले बालपण

आठवणी काळजात त्याच्या

कालपण, आजपण, उद्यापण



Rate this content
Log in