लय रसाळ उस
लय रसाळ उस
सखे उस माझा सध्या लय जोमात
म्हणे पडलेय मी तुमच्या प्रेमात।।धृ।।
असे रसाळ लय तुमचा उस
पाहताच म्हणे मनोमन फसं
असं ठसवलंय तुम्हीच मनात
म्हणे पडलेय मी तुमच्या प्रेमात।।१।।
उस पाहताच उमटलं हसं
त्यातला आटलाय सारा रस
कसा भरावा सांगा मनात
म्हणे पडलेय मी तुमच्या प्रेमात।।२।।
उस मधाचा असे हो झरा
उन्हाने सुकून गेलाय सारा
वाटते जाईल बघा तो कोमात
म्हणे पडलेय मी तुमच्या प्रेमात।।३।।
बघा उसाचा कस निघाला सारा
कष्टाने घामाच्या वाहिल्यात धारा
नाही दिसंना मला तो जोमात
म्हणे पडलेय मी तुमच्या प्रेमात।।४।।
उस सुकलाय आता बनवा रम
मला दिसंना त्यात बिलकुल दम
कशाला पडू मी फसव्या फंदात
नाही पडले तरी बी म्हणत्यात
म्हणे पडलेय मी तुमच्या प्रेमात।।५।।