प्रेमात पडली
प्रेमात पडली
समजून प्रेम अदांना सखी
मिठीत माझ्या आनंदे रडली
बहर यावा प्रीतीला आपल्या
कारण मी तुझ्या प्रेमात पडली।।१।।
प्रेमाची परिभाषा समजतांना
प्रीतीची सख्या मज धुंदी चढली
विसावते क्षणोक्षणी हृदयी तुझ्या
कारण मी तुझ्या प्रेमात पडली।।२।।
तुझ्या लटक्या झटक्यांची जणू
मलाही सख्या नशाच जडली
आठवण त्या क्षणांची करते सदा
कारण मी तुझ्या प्रेमात पडली।।३।।
तुझ्या प्रीत सागरात वाहतांना
जन्मोजन्मीची नाती मी तोडली
तुझ्यातच माय पित्याला पाहते
कारण मी तुझ्या प्रेमात पडली।।४।।
प्रेमाचे बंध ते कणखर करण्या
मंगळसुत्राशी रे नाळ जोडली
हा जन्म सख्या तुजला वाहते
कारण मी तुझ्या प्रेमात पडली।।५।।