स्त्री एक प्रेरणा
स्त्री एक प्रेरणा
कोण्या अर्थी विचारावं असं मला
सांग तू काय पाहिलंस माझ्यात?
विश्वाच्या उद्धारासाठी घेतली जणु
पाळण्याची दोरी तुझ्याच गं हातात।।१।।
उपकार त्या राजमाता जिजाऊचे
पोटी प्रसविला जगज्जेता हिरा
स्वराज्याच्या बाळकडूने मिळाला,
बहुजन प्रतिपालक जग उद्धारा।।२।।
लेकींसाठी झेलतांना दगड माती
शिक्षिका अजरामर जाहली जगात
खांद्याला खांदा लावून लढण्याची
वृत्ती दिसली सावित्रीच्या त्यागात ।।३।।
जाता पती विदेशी शिक्षणासाठी
फुलवला संसार कष्टानं गं अपार
त्या त्यागाची तुला किंमत मिळाली
बनून पती देशाचा घटनाकार।।४।।
चुल अन् मुल सांभाळत न बसता
चढवलीस तलवारीला अफाट धारत्या त्यागाची तुला किंमत मिळाली
बनून पती देशाचा घटनाकार
इतिहासात अजरामर झाशी जाहली
करून कर्तृत्वाने शत्रूला हो गपगार।।५।।
आकाशी उतुंग भरारी घेण्यासही
आत्मविश्वास कुठे ना कमी पडला
स्वच्छंद विहारता कल्पना चावला
अवकाशयानात नवा इतिहास घडला।।६।।
तरीही तू का विचारावे मजला
सांग तू काय पाहिलंस माझ्यात?
अथांग सागरापरी कर्तृत्वाला आज
खरंच निशब्द केलेस, माझ्या शब्दात।।७।।