प्रेम म्हणजे काय असतं
प्रेम म्हणजे काय असतं
नाही सुटला कधीच हा गहन प्रश्न
खरंच,प्रेम म्हणजे काय असतं
साध्या सोप्या भाषेत सांगतांना
अंतकरणापासून अनोळखीही आपलंसं भासतं।।१।।
विचारतांना या प्रश्नाचे खरे उत्तर
बाप हे व्यक्तिमत्त्व आयुष्याला ठिगळं लावत असतं
नको आपुलकी कमी पोटच्या गोळ्याला म्हणून
सदा कुटुंबाचा भार सोसतांना दिसतं।।२।।
विचारावं कधी प्रेम म्हणजे काय असतं
आई नावाच्या आयुष्य घडवणाऱ्या देवाला
हाडामांसाच्या गोळ्याला आकार देवून
लेकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणाऱ्या जीवाला।।३।।
प्रेम म्हणजे काय असतं
नाही मिळत आज या प्रश्नाचे उत्तर
जन्मदात्यांना वृद्धाश्रमातील हालअपेष्टा देतांना
पोटचा गोळाच करतो वेदनेने निरूत्तर।।४।।
हरवलेले दिसते मनातूनच प्रेम आमच्या
या धकाधकीच्या जीवनाचा सहारा घेऊन
विसरत चाललो आपुलकी आम्ही सारी
प्रेम या विवंचनेला प्रगत तंत्रज्ञानी बंदिस्त ठेवून।।५।।