चूल
चूल
नेहमीप्रमाणे आजही सकाळी
लवकरच जाग आली
बघितले डोकावून घरात
तर सर्वच झोपलेले
मीही ठरवलं झोपून घ्यावं
अन् बिछान्यात पुन्हा अंग टाकायचंच
तर मला कुठून तरी
हाक मारल्याचा आवाज आला
थोडासा कावरा बावरा झालो
पण पुन्हा आवाज आला
तर आज चक्क माझ्याशी
माझ्या घरातील चूल बोलत होती
तो आवाज ऐकून थोडा घाबरलो
पण ती म्हणाली घाबरू नकोस
तू घराचा खांब आहेस ना
म्हणून तुझ्याशीच थोडंसं
मनातलं बोलायचंय, मनात
साठवलेलं गुपीत खोलायचंय
मी देखील निस्तब्ध होऊन
ऐकत राहीलो तिचं म्हणणं
तर ती म्हणाली...
सहा मास झाले
घरात वेळेवर काही शिजत नाही
अंग मेहनतीसाठी तू कुठे
झिजत नाहीस
अन् अंगही तुझे घामाने भिजत नाही
पण तरीही सतावतोय प्रश्न
तुल
ा रोजच्या दोन वेळच्या भाकरीचा
पण सुटेना गुंता
काही केल्या चाकरीचा
अनुभवतेय मी पण असेल घरात
तर खायचं, नाही तर उपाशी राहायचं
पण तुझी येईना कुणाला कीव
बायकोसह लेकरंही लावतात
बरं तूला खूपच जीव
त्यांचंही म्हणणं मी रोजच ऐकत असते
त्या वेदनेने मनात धुसमुसते
कारण बघते मी...
लहान लेकरंही करत नाहीत
खाऊसाठी बापापाशी हट्ट
फक्त बाप पाहीजे म्हणून
मारतात प्रेमाची मिठी घट्ट
सर्वांचा तारणहार म्हणून
ठेव स्वतःच्या मनगटावर विश्वास
जातील हेही दिवस
लोटांगण घालील सुख तुझ्या
पायाशी...
त्यासाठी तू हतबल होऊ नकोस
चिंतेत राहू नकोस
आल्या संकटाचा सामना कर
तरच सुख समृद्धीनं नवी उभारी
घेईल पुन्हा आपले घर
नवी उभारी
घेईल पुन्हा आपले घर