नातं मैत्रीचं
नातं मैत्रीचं
भगवंता तुझ्या अपार महिमेची
वर्णितो रसाळ अंतकरणाने ख्याती
दोन मने भिन्न जाती असतांनाही
जडली जन्मोजन्मीची नाती।।१।।
नाही करत मायबाप आमुचे
घरात आमुच्या जातीयतेचा हेवादावा
असतांना मी हिन्दू अन् तू मुसलमान
अखंडित जळतोय मैत्रीचा दिवा।।२।।
जातीयतेच्या किड्याची दहशत वाढून
साऱ्या जगावर घातलाय जरी घाव
आम्ही साथी लाभलो एकमेकांस
वसलाय जेथे आमुच्या स्वप्नांचा गाव।।३।।
गरीबाचे खाऊन पोहे इतिहासात
कृष्ण सुदाम्याची मैत्री अजरामर
मिटविण्या जातीयतेची विखारी दरी
टाकते मैत्री आमुची भरीसभर।।४।
धर्मनिरपेक्षतेचा डंका मिरवण्या
झालो आम्ही एकमेकांचे साथी
मुक्त जीवन जगण्याची प्रेरणा घेवून
देवूयात जातीवादाला कायमची मुठमाती।।५।।