ध्येयवेडा
ध्येयवेडा
ध्येयवेडा जीव माझा
विरुद्ध दिशेने जाणारा
आगळे वेगळे काहीतरी
कायम करू पाहणारा
प्रवाहासोबत जाणे
कधी नाही पटणार
काही वेगळे करून
इतिहास घडवणार
ध्येय माझे कायम
खुणावते मला
एकट्याचा प्रवास
सांगू कुणाला
वेडा ठरविसी जग
अकलेचे तारे तोडून
ना केला नाद तयांचा
दाखविले संकटा भिडून
ध्येय आले कवेत
सार्थक झाले जीवन
कष्ट घेतले अपार
लाभले सुखी जीवन
