STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

3  

Prakash Chavhan

Abstract

ध्येय वेडे सर्वच तारे

ध्येय वेडे सर्वच तारे

1 min
215

ध्येय वेडे सर्वच तारे 

असावयास मज प्रकाश 

टिमटिमून सध्यातरी 

ज्योत घेऊन चालते 


ध्येय वेडे सर्वच तारे 

खटपट वाढीची सर्वांपाशी 

कुणी खडकात कुणी सुपिकात 

बीजासारखे वाढलेले 


ध्येय वेडे सर्वच तारे 

जन्मतः भेटला संघर्ष खजिना 

लुटतील इथे लुटवतील तिथे 

सर करतील लक्ष्याचा गड 


ध्येय वेडे सर्वच तारे 

स्तभं होतील छताचे 

तोडलात तुम्ही त्यांचा कणा 

देणगी देऊन प्रलोभनाची 


तरी तें उठतील जगण्यासाठी 

हरण्याची त्यांची वृत्ती नाही 

आहे क्रांतीची ताकत अंगी 

बदलतील पुन्हा दाही दिशा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract