धुम्रपान
धुम्रपान
स्वतः जळूनी मला जाळते
धूरी सोडते माझे जीवन,
रचित चाललो स्वहस्ताने
सरणच माझे मीच प्रतिदिन
आधी ओढली झुरक्यांसंगे
बेदरकारी त्या वलयांतून,
गुलाम केले या सवयीने
विचार-वायू सारे व्यापून
'सोड'सांगते माय कधीची
आणून पाणी तिज ह्रदयातून,
मी तर राजी,ना सोडी ती
अडकून राही ह्या धमन्यांतून
