धाव रे आता !
धाव रे आता !
जय हनुमंता अंजनीसुता
पवनवेगे धाव रे आता
जय जय हनुमंता अंजनीसुता
पंचखंडात पसरे विषाणू
त्रस्त करीतो जीवा जीवाणू
संकटातूनी सोडवी नाथा
दिव्य औषधी आण तू आता
मुक्त विहार बंद झाला
जन व्यवहार मंदावला
एकमेकांना पारखा झाला
उपाय काहीच सापडेना आता
चिमणी पाखरं घरटी कोंडली
किलबिल त्यांची बंद पडली
धाव पाव रे पवनसुता
कर संहार या दैत्यांचा आता
