धारा.
धारा.
गालावरुनी उतरत अलगद
मनावर करती मारा
देहासव घायाळ मनही
कशा बरसती धारा
शरीर जपावं, जरा लपावं
घेत आडोसा, आसरा
तरी मनाला झोंबुन जातो
गार हा अवखळ वारा
ओहळ खळखळ वाहत जाती
नदी-नालेही तुंब ही होती
धरणी बघून नटलेली ही
पडती काळजावर चरा
सोबत ये तू साथ दे
झेलीत पाऊस हात दे
हळूच मिठीत घेत जराशी
कर या मनाला बरा
देहासव घायाळ मनही
कशा बरसती धारा...

