देवऋषी
देवऋषी
दानव ना देव ना ऋषी
यांस म्हणे जन देवऋषी
भाळास लावी काळा टिळा
गळा घाली अस्थिच्या माळा
डगला अंगी काळ्या रंगाचा
पिडीतास मार देई असुडाचा
जबरदस्त बाहेरवसा झाला
चार शनिवारला खेटया घाला
दरआमावस्याच्या मध्यरात्री
भूतं घालवण्याची देई खात्री
सात कढाया धन या तळघरात
मी पैशाचा पाऊस पाडतो घरात
लिंबू बिबे हिरव्या मिरच्याच
काळी बाहुली बांधा उलटीच
उतारा उतरुन टाकावा लागेन
कोंबडं बकरं बळी दयावं लागेन
सोने अन् पैशाची करतात लूट
कोणास सांगू नका घालती अट
विज्ञानाने जगात मारलीय बाजी
अंधश्रद्धाळूंनो सोडा आता बुवाबाजी
