STORYMIRROR

Revati Shinde

Classics

4  

Revati Shinde

Classics

देवीची स्तुती

देवीची स्तुती

1 min
4

वाघावर बैसोनी 

आली आली ग आई भवानी 

नेसली तिने अंजिरी पैठणी

 गळ्यात तिच्या शोभे

 कवड्यांची माळ

 तिची नि माझी जोडलीय

 जन्माची नाळ

  हत्तीवर बैसोनी

 आली ग गजलक्ष्मी

 नेसली तिने साडी  रेशमी

गळ्यात शोभे तिच्या

 हिऱ्या मोत्यांचा रत्नहार 

स्वागता तिच्या उघडले

 मी घराचे द्वार 

 आली ग हंसवासीनी

 हाती  विणा 

 अंगभर मोत्यांचे मणी

 प्रार्थना आहे हिच 

तिच्या चरणी

 राहो सदा  मधुर ग 

माझी वाणी

 दृष्टांचा कराया संहार 

 आईने घेतलाय कालिकेचा

 अवतार 

तिच्या नावाचा

 करूया जागर

 होऊनी प्रसन्न करेल ग

 आई आपुले रक्षण.

सौ. रेवती प्रशांत शिंदे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics