देवाधिदेव महादेव (बारोळी)
देवाधिदेव महादेव (बारोळी)
हे देवाधिदेव महादेव शंभो
ब्रम्हांड, सृष्टी ही रचीयलीत
हलाहल पिवूनी पृथ्वीवरती
सुशांती प्रस्थापित केली.
या जन्ममृत्यूचा भेद जाणन्या
योगवेद,अष्टरस गंगा शिरीधरीली
या निसर्गाने नटविली सृष्टी ही
नटराजनृत्य विद्या ही अवतरली.
अनाकलनीय चंद्राकोर जटाधारी
नागहार सृष्टीचे रक्षक तुझ्या गळा
आदीअंत त्रीनेत्रशंकर उद्धारका
विदृपरूप गुढ अविष्कारी विज्ञानाला..
