देवा तू पाव रे
देवा तू पाव रे
गरिबीचा दगड आम्ही कष्टाने फोडतो,
यशाची मूर्ती आम्ही जिद्दीनेे घडवतो,
देवा तूू पावतो, देवा तु पावतो॥
थेंब थेंब घामाचा मोल क्षणाचे करतो,
चंद्राचा सूर्य करुनी दिवस काढतो,
देवा तू पावतो, देवा तू पावतो ॥
अंगात घालतो चिंधी परी पोषाख स्वाभिमानी,
अभिमान आमचा सत्याने कमावतो,
देवा तु पावतो ,देवा तू पावतो ॥
सुखाची शिदोरी आमची भाकरी समाधानी,
मोजकी असली तरी आम्ही वाटू खातो ,
देवा तुु पावतो देवा तु पावतो ॥
मावळे आम्ही शिवबाचे काळाशी झगडतो
परिस्थितीची खिंड आम्ही शौर्याने लढवतो
देवा तू पावतो देवा तू पावतो॥
कृपा तुझी आम्हावरी अशीच राहू दे
माणुसकीचे दान आमच्या झोळीत टाक रे
देवा तूू पाव रे देवा तू पाव रे॥
