देव विठ्ठल विठ्ठल
देव विठ्ठल विठ्ठल
देव विठ्ठल विठ्ठल
करु तया पाचारण
खूप आळविता त्याला
करील का उद्धरण?
देव नाही हो मंदिरी
देव वसे मनोमनी
भेटे सर्व भक्तांलागी
पाही उघड्या नयनी
नका धरु मनी शंका
कर्मयोगा तुम्ही लागा
देव भेटेल तुम्हाला
कर्म करता करता
