Manisha Awekar

Classics

3  

Manisha Awekar

Classics

देव गजानन!!

देव गजानन!!

1 min
234


वर्ण 12  यती  6 व्या अक्षरावर


देव गजानन, रुप मनोहर

येतसे दाटून, भक्तीस बहर //धृ//


विघ्नहर्ता तूच, तूच तारणारा

भक्ती पारखूनी, तूच पावणारा

डोळे लावूनीया, वाट पाहणार (1)


आनंदाचा कंद, देवा विनायका

मुखावरी स्मित, झळके तयाच्या

आज जाहलासे, भेटण्या आतुर

(2)


षोडषोपचारे, भक्त पूजा करी

दुर्वा फुले हार, अर्पणही करी

मोदक नैवेद्य, केलासे तयार (3)


थैमान घालते, संकट रोगाचे

जीवही घेतले, किती निष्पापांचे

करुणासागर, कृपा भक्तांवर (4)


भक्तीभावे केले, पूजन आपुले

देवा सर्व गोड, मानूनीया घ्यावे

कृपावंत व्हावे, भोळ्या भक्तांवर (5)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics