STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

देव भावाचा भुकेला

देव भावाचा भुकेला

1 min
510

देव शोधावया नको, जाणे कुण्या मंदिरात

देव भावाचा भुकेला, राहतसे अंतरात ।।धृ।।


जसा भाव तसा देव, स्वतः देवाने कथिले

आम्ही ऐकले, वाचले, परी लक्ष नाही दिले

बुडू पाहे जीवनाची, नौका भव सागरात ।।१।।


संसाराच्या रगाड्यात, देव कसा विसरला

येता दुःखाचा डोंगर, तेव्हा देव आठवला

धुंडाळतो ईश्वराला, तिर्थस्थानी दगडात ।।२।।


भाव धरोनि द्रौपदी, चिंधी बांधते बोटाला

आले नाही प्रेम तसे, सत्यभामेच्या वाट्याला

सखा होउनी पार्थाचा, उभा पाठी संकटात ।।३।।


शबरीची उष्टी बोरे, प्रेम भावाने चाखली

भावपूर्ण भक्ती, शक्ती, हनुमंताची पाहिली

छाती फाडुनी दाविला, राम प्रभू हृदयात ।।४।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational