STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Inspirational

3  

.प्रमोद घाटोळ

Inspirational

देऊ धैर्याने लढा

देऊ धैर्याने लढा

1 min
391

माणसातल्या माणसासाठी हो माणसा खडा

देऊ धैर्याने लढा , चला देऊ धैर्याने लढा धृ


शोषीत शोधू जमात सारी

कल्याणाची वाजवू तुतारी

अन्यायाचा फोडून टाकू पापीत तो घडा I


केवढ न देऊ मान नृपाला

येऊ देऊ रंक रुपाला

समुद्रातूनी मोती मिळते देवू याला तडा I


कुणावरही ना तलवार उगारू

शांतीची पिऊनीया दारू

गौतमाच्या संदेशाने नटवू वसुंधरा I


भिन्न न मानू जाती धर्म हे

ऐक्याचे खरे मर्म हे

राष्ट्राच्या अखंडतेचा मंत्र गिरवू हा खरा I



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational