देखणी दिसतेस तू
देखणी दिसतेस तू
दिवस सरतो नि येते रात
मंद चांदण्याची ही रात
मज हळूच कानात येऊन
सांगते तुझे रूप किती देखणे
हे प्रिये, आज चंद्रही रूप तुझे बघुनी
हळूच लाजला आहे
इतकी देखणी दिसतेस तू
चंद्राला पण लाजवणे तुला भाग पडले
रूप तुझे हे लोचनी
ना हटत नजर तुझ्यावरी
भाळलो मी रूप तुझे पाहुनी
ही चांदणीपण लाजली तुझे रूप पाहुनी
लावलेस जीव तू माझ्या परी
वेडापिसा झालो मी तुला पाहण्यासाठी
वाटत ही रात संपूच नाही
तुझ्या मिठीतच राहून रात हि सरली
इतके देखणे रूप तुझे
स्वप्नातही न सोडवे मला हे रूप तुझे
खरच इतकी देखणी दिसतेस तू
वेड लावतेस माझ्या मनाला तू

