Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

शशिकांत राऊत

Inspirational Others

4  

शशिकांत राऊत

Inspirational Others

देहाची तिजोरी

देहाची तिजोरी

1 min
314


अंतरीचा आत्मा । ईश्वराचा अंश ।

सोडूनिया द्वेश । भक्ती करा ।।

डोळ्यांतूनी पाही । देव सर्व काही ।

क्रोधाची हि ग्वाही । नेत्री नको।।

कानांनी ऐकावे । हरिचे कीर्तन ।

नसावे नर्तन । मदमस्त ।।

प्रत्येक श्व़ासात । देवाचा हा वास ।

संशयाचा ध्यास । लावी फास ।।

जिव्हेत असावी । सरस्वती वाणी ।

नको ध्यानी मनी । शिवीगाळ ।।

दोन्ही हाती करा । सदाचारी काम।

वाम मार्गे दाम । नको कधी ।।

पायांनी चालावे । सज्जनांचा मार्ग ।

देहा मिळे स्वर्ग । पृथ्वीवरी ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational