डोळयातला माझा वंसत.. ....
डोळयातला माझा वंसत.. ....
रंग किती हे पाखरांचे
गंध निर्मिले कुणी फुलांचे
आकाशाची ही निळाई
कोणी ओतली इतकी शाई.
दर्या सागर पर्वत
डोंगर कोणी बनवले
हिरवी झाडे कोवळी पाने
काय बरे पक्षी गुणगुणले
साद घालुनी वाऱ्याने
जणू आलाप छेडले
सांगा खोदल्या दर्या
कोणी इतक्या खोलवरी
समुद्राची गहराई
मोजली कोणी आजवरी
नेमाने सूर्य घेऊन येतो पिवळ्या ऊन्हाचे सडे
सांज होता सांगा जाई कुणीकडे
वसंत येई शांतपणे जन्म मरणाचे गुपित उलगडणे
मातीमोल हे जीवन सारे मातीतच मिसळणे
नवी पालवी गाऊन जाई नव्या उद्याचे सुखद तराणे
चांदणे शिंपीत रातराणीचा सुंगध बहरतो
नव्या जन्माचे रहस्य सांगण्यास वसंत नियमित येतो
