STORYMIRROR

Kanchan Thorat

Abstract Romance

3  

Kanchan Thorat

Abstract Romance

डोळे

डोळे

1 min
212

ते गहिरे गहिरे

जहरी जहरी,

चमकणारे ओल्या कडांचे.

ते बोलणारे, अन्

थांबणाऱ्या; 

निरागस भावांचे....

खोल कुठेतरी गर्तेमध्ये,

ओढून नेणारे.

अन् कधी संवेदी हृदया,

आरपार चिरणारे.

स्वप्ने अन् स्मृती,

सखे ...त्यात कित्येक.

तू दे मजला निवडून 

त्यातील ;

हव्या, तितक्या अनेक.

या गहिऱ्या गहिऱ्या 

जहरी जहरी...डोळ्यांची 

स्वप्न, सखे मी साकारतो ,

स्वप्न सखे साकारतो...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract