डोळे जुल्मी
डोळे जुल्मी
तुझे दोन डोळे खरे जुल्मी
अनायास हृदया हरे जुल्मी
मनाच्या कपाटात धाडीची
नसे कल्पना ती बरे जुल्मी
कडांच्या मधे द्रव्य पाण्याचे
सराईत चोरी करे जुल्मी
लुटीचाच वाटा मला दे ना
निशा ती गुलाबी सरे जुल्मी
इथे पाकळीच्या वरी रेखा
तिथे काळजाला चरे जुल्मी

