चर्चाखोर
चर्चाखोर
वाचाळांना एकच नाद
रोज रोज नवेच वाद
वाहिन्यांना अमाप खाद्य
चोवीस तास सुरूच वाद्य
अमका बोलला असा तसा
तुमचा पक्ष शांत कसा
ओता तेल लावा काड्या
उंच चढवा आपल्या माड्या
चर्चा करती डोकी चार
अंगावरती धावून पार
चर्चेमधून निघते काय
खाली डोके वर पाय
फुटताच वाद्य निघतात वादक
जाहिराती येतात भलत्याच मादक !!
