चर्चा मैफिलीत
चर्चा मैफिलीत
दिलावर घाव, सारं येडं झालं गाव
दिलाची कसरत, दिन-राती तारावर ।
गल्लीत मी तिच्या, ती ऊभी दारावर
चर्चा मैफिलीत, तिच्या लाल गालावर,।।धृ।।
औतावर मजा येते,
थकवा रजा घेते ।
न्याहाळते ती दूरून
मले घोर सजा देते।।
मनी काहूर माजते, जवा-जवा ती भीजते
पानी विहिरीवर भ , मारोतीच्या पारावर।।१।।
तिले गुलाबाचा वास
तीले पाह्यासाठी खास।
आसुरलो भलताच
कंठी विरहाचा फास।।
एक ती लाखात, तिची मोठी औकात
तिचं सपान डोयात, चालतो मी आरावर।।२।।
आहे अशी रुपवान
जनू सोन्याचीच खान।
नजरेत काम बाण
तिच्या श्वासात तुफान।।
नंदादीप ती तेवता, हृदयातली देवता,
राती लागेना पापणी, काटा गेला बारावर।।३।।

